घरात मुलाचा साखरपुडा आणि आगीने घेरले, चौघांचा अंत

Foto
अहमदाबाद  : गुजरातमधील गोध्रामध्ये मध्यरात्री आलिशान घराला लागलेल्या आगीत धुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत झाला. आज याच घरात मोठ्या मुलाचे लग्न होणार होते. रात्रीच सर्व तयारी करण्यात आली होती. आज सकाळी ते वापीला जाणार होते, परंतु आगीतून निघणाऱ्या विषारी धुरामुळे त्यांचे प्राण गेले. मृतांमध्ये कमलभाई दोशी (50), त्यांची पत्नी देवलाबेन (45), त्यांचा मोठा मुलगा देव (24) आणि त्यांचा धाकटा मुलगा राज (22) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा तळमजल्यावरील एका सोफ्याला शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणामुळे आग लागली. घर काचेने बंदिस्त होते. ज्यामुळे विषारी धूर बाहेर पडू शकला नाही. परिणामी, कोणालाही वाचण्याची संधीच मिळाली नाही. 

दरम्यान सकाळी घरातून धूर निघताना शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला कळवले. तथापि, तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता. गोध्रा येथील वर्धमान ज्वेलर्सशी संबंध असल्यामुळे हे देशी कुटुंब प्रसिद्ध होते. ज्या घरातून त्यांच्या साखरपुड्यासाठी  निघणार होते त्याच घरातून या चारही सदस्यांच्या अंत्ययात्रा निघाल्या.